संस्थे विषयी



परंपरा स्वप्नपूर्तीची...

गेल्या २७ वर्षापासून सर्वसामान्य ग्राहकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरतपणे अर्थसहाय्य व मनोबल देणारी पतसंस्था म्हणजे विजय नागरी सहकारी पतसंस्था... १९९१ साली संस्थापक चेअरमन कै. डॉ . कमलाकर गणेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य नागरिकांना पतपुरवठा करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. अतिशय छोट्या स्वरुपात असलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. संगमनेर तालुक्यातील पहिले वीजबिल भरणा केंद्र सुरु करून संस्थेने जनसामान्यांच्या मनात एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले. लाईट बिल भरणा म्हणजे विजय नागरी हे समीकरण दृढ होत जाऊन संस्थेशी ग्राहकांचे इतर व्यवहार वाढत गेले व संस्था सर्वदूर पोहोचली व ग्राहकपाया बांधला गेला...

संस्थेचा २७ वर्षांचा हा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. संस्थेमध्ये ग्राहकांना दिला जाणारा आदर, आपुलकीची सेवा आणि खूप मोठी विश्वासार्हता या जोरावर संस्थेने नुकताच ११० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. अतिशय छोट्या छोट्या व्यवसाय सुरु केलेल्या ग्राहकांना त्यावेळी पतपुरवठा करून ग्राहकांच्या व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाची भांडवल उपलब्धतेची भूमिका संस्थेने बजावली. आज त्या ग्राहकांच्या यशाचा आलेख आणि संस्थेप्रती त्या ग्राहकांची निष्ठा दोन्ही अचंबित करणारी आणि अतिशय समाधान देणारी आहे.

सातत्याने ऑडीट वर्ग अ सांभाळताना सगळ्याच संस्थाना तारेवरची कसरत करावी लागते पण संस्थेची गुणवत्ता व दर्जा उंचावण्यात व राखण्यात संस्थेची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. ग्राहक हिताशी कधीही तडजोड न करणारी संस्था म्हणून संस्थेचे नाव समाजमनात उमटले आहे. छोटे मोठे व्यवसाय उभे करण्यासाठी पाठबळ देण्याबरोबरच इतरही सामाजिक कार्यात संस्था नेहेमीच अग्रेसर राहिली आहे फक्त ठेवी घेणे आणि कर्ज देणे एवढेच नाते ण सांभाळता ग्राहकांच्या मनात "आपली हक्काची संस्था " हा विश्वास निर्माण करण्यात संस्थेला यश मिळाले आहे. गेल्या १४ वर्षापासून गणपतीच्या कालखंडात संस्थेतर्फे १ लक्ष गणपती अथर्वशीर्षपठणाचा कार्यक्रम राबवला जातो. जवळपास ५००० शालेय विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम हि विजय पतसंस्थेची खास ओळख झाला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढावा व बुद्धीला चालना मिळावी यासाठी संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. डॉ. पाठक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले जाते. दिवसेंदिवस या स्पर्धेची लोकप्रियता वाढत असून संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू येत असतात. संस्थेतर्फे दर पावसाळ्यात वृक्षारोपण केले जाते त्याचप्रमाणे चांगले काम करणा-या सामाजिक संस्थाना व उपक्रमांना दरवर्षी भरगोस देणगी दिली जाते.

संस्थेच्या यशाचा आलेख पुढे जात असतानाच गेल्या ५ वर्षापासून संस्थेने एक आगळी वेगळी योजना लोकांसमोर आणली आणि त्यामुळे संस्थेची ओळख फक्त संगमनेर शहर व तालुक्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्र भर पोहोचली... या योजनेचे नाव आहे "विजय महिला सबलीकरण योजना". महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे , स्वावलंबी करणे , स्वतःचा व्यवसाय सुरु करून देणे त्यासाठी कर्जपुरवठा व मार्गदर्शन करणे आणि एकंदरीत त्यांच्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देणे हा या योजनेचा हेतू... साधारण ५ वर्षापूर्वी २० महिलांना कर्ज देऊन सुरु केलेल्या या योजनेत आजपर्यंत २५०० महिलांना कर्जपुरवठा केला गेला. फक्त कर्जपुरवठा करूनच न थांबता त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते. आजपर्यंत १५ कोटींचे कर्ज वाटप या योजने अंतर्गत असून थकबाकीचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. महिलांसाठी विविध कार्याक्रमचे आयोजन संस्थेतर्फे दरवर्षी केले जाते. यात महिलांची आरोग्य तपासणी शिबीर , व्यवसाय मार्गदर्शन , विविध व्याख्याने, संक्रांती हळदी कुंकू कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम घेतले जातात. आज जवळपास २५०० कुटुंबांचा जीवनदर्जा उंचविण्यात संस्थेची महत्त्वाची भूमिका असून महिलांसाठी ग्राहक भांडार, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे यासाठी संस्था योजना तयार करत आहे. स्वछ भारत अंतगर्त संस्थेतर्फे जनजागृती मोहीम राबविली गेली. त्यात महिलांना डस्टबीन चे वाटप करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमातून ग्राहकांशी जोडली गेलेली नाळ संस्थेच्या यशात नेहेमीच महात्व्वाची राहील.

विश्वासर्हता , प्रामाणिकपणा ,उत्तम ग्राहक सेवा आणि समाधानी ग्राहक हि संस्थेची मालमत्ता असून या सूत्रांच्या आधारे आणि संचालक मंडळाचा दुरदृष्टीकोन , उत्तम निर्णय क्षमता व मार्गदर्शन आणि कर्मचा-यांची व संचालक मंडळाची मेहेनत या बळावर संस्था यशाची शिखरे गाठत आहे. याचाच परिणाम म्हणजे संस्था विविध पुरस्कारांनी गौरविली गेली. सहकार क्षेत्रात मानाचे समजले जाणारे "बँको पुरस्कार" त्याचप्रमाणे " प्रतिबिंब", , ' दीपस्तंभ या पुरस्कारांनी संस्थेच्या कामाची दखल राज्यपातळीवर घेतली. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत व सत्कार संस्थेतर्फे एक छोटेसे रोप देऊन केला जातो व त्या रोपाप्रमाणेच संस्थेचे यश व कीर्ती बहरत जावो हि इच्छा...

०२४२५ - २२६०८३

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा...