ठेवीचे आकर्षक व्याजदर

१५ दिवस ( कॉल मनी ठेव) ५.७५%
४६ दिवस ते १८० दिवस ६%
१८१ दिवस ते ६.२५ दिवस ६.२५%
१३ महिने. ८%
ज्येष्ठ नागरिक. ८.५०%
रिकरिंग ठेव ८%
गुंतविल्यास दर महिन्यात व्याज रुपये १०००/-
कल्पवृक्ष ठेव 96 महिन्यात दाम दुप्पट. ८.७६%

दि ३१/०३/२०२५ अखेर सांपत्तिक स्थिती

भाग भांडवल २ कोटी २२ लाख
निधी ३३ कोटी ०२ लाख
ठेवी. १३० कोटी १६ लाख
कर्ज. १०५ कोटी ४४ लाख
गुंतवणूक. ४४ कोटी ५२ लाख
नफा ३ कोटी ५२ लाख
एकत्रित व्यवसाय. २३५ कोटी ६० लाख

संस्थे विषयी

गेल्या २७ वर्षापासून सर्वसामान्य ग्राहकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरतपणे अर्थसहाय्य व मनोबल देणारी पतसंस्था म्हणजे विजय नागरी सहकारी पतसंस्था...

परंपरा स्वप्नपूर्तीची...

१९९१ साली संस्थापक चेअरमन कै. डॉ . कमलाकर गणेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य नागरिकांना पतपुरवठा करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. अतिशय छोट्या स्वरुपात असलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. संगमनेर तालुक्यातील पहिले वीजबिल भरणा केंद्र सुरु करून संस्थेने जनसामान्यांच्या मनात एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले. लाईट बिल भरणा म्हणजे विजय नागरी हे समीकरण दृढ होत जाऊन संस्थेशी ग्राहकांचे इतर व्यवहार वाढत गेले व संस्था सर्वदूर पोहोचली व ग्राहकपाया बांधला गेला.... संस्थेचा २७ वर्षांचा हा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. संस्थेमध्ये ग्राहकांना दिला जाणारा आदर, आपुलकीची सेवा आणि खूप मोठी विश्वासार्हता या जोरावर संस्थेने नुकताच ११० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. अतिशय छोट्या छोट्या व्यवसाय सुरु केलेल्या ग्राहकांना त्यावेळी पतपुरवठा करून ग्राहकांच्या व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाची भांडवल उपलब्धतेची भूमिका संस्थेने बजावली. आज त्या ग्राहकांच्या यशाचा आलेख आणि संस्थेप्रती त्या ग्राहकांची निष्ठा दोन्ही अचंबित करणारी आणि अतिशय समाधान देणारी आहे. सातत्याने ऑडीट वर्ग अ सांभाळताना सगळ्याच संस्थाना तारेवरची कसरत करावी लागते पण संस्थेची गुणवत्ता व दर्जा उंचावण्यात व राखण्यात संस्थेची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. ग्राहक हिताशी कधीही तडजोड न करणारी संस्था म्हणून संस्थेचे नाव समाजमनात उमटले आहे...

सविस्तर वाचा

इतर क्रियाकलाप

संगमनेर शहरातील विजय नागरी पतसंस्था गेल्या २७ वर्षापासून शहरातील नावाजलेली पतसंस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेने नुकताच १०० कोटी च्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.


विजय महिला सबलीकरण योजना

विजय महिला सबलीकरण योजने अंतर्गत(बचत गट) आयोजित महिला मेळाव्यास उदंड प्रतिसाद. महिलांचा व्यक्तिमत्त्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन.


भाविकांना रोपांचे वाटप

संस्थेतर्फे आयोजित प्रत्येक कार्यक्रमात किंवा संस्थे मध्ये येणा-या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत रोप देऊन करण्यात येते. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन यासाठी संस्था नेहेमी प्रयत्नशील असते.


भव्य बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

संस्थेतर्फे गेल्या १५ वर्षांपासून भव्य बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन केले जाते. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून खेळाडू उपस्थित राहतात. संस्थेतर्फे बुद्धिबळ प्रशिक्षणही घेतले जाते.


स्वच्छतेबाबत जनजागृती करणारा विजय महिला हळदी कुंकू समारंभ

त्याचाच एक भाग म्हणून विजय नागरी पतसंस्थेने विजय महिला बचत गटाचा हळदी कुंकू कार्यक्रम अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. जवळपास १५०० महिलांना विजय पतसंस्थेने डस्टबिन चे वाटप केले. स्वच्छ संगमनेर २०१८ च्या पार्श्वभूमी वर महिलांनी स्वच्छतेचा वसा घ्यावा.


दरवर्षी १ लक्ष गणपती अथर्वशीर्ष आवर्तने

संस्थे तर्फे गेल्या १४ वर्षापासून सातत्याने गणपती उत्सवाच्या कालखंडात १ लक्ष गणपती अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी शालेय विद्यार्थी व नागरीक असे सुमारे ६००० भाविक उपस्थित होते. दिवसेंदिवस या उपक्रमाचा प्रतिसाद वाढत असून शालेय मुलांच्या पाठांतर व उच्चार शुद्धता यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

आमच्या सेवा

vijay patsanstha sangamner

सेवा

सेफ डिपॉंझीट लॉंकर्स

मुख्यकार्यालय येथे सेफ डिपॉंझीट लॉंकर्सची सोय

वीज बिल भरणा

आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही

विविध कर्ज वाटप

जमीन / गृहतारण, ऑपरेटीव्ह गृहतारण, हायरपरचेस, कॅश क्रेडीट, फिक्सलोन, पगारदार लोन, सोनेतारण, मुदत ठेव तारण

आकर्षक व्याजदर ठेवी

१५ दिवस ( कॉल मनी ठेव) ५.७५%
४६ दिवस ते १८० दिवस ६%
१८१ दिवस ते ६.२५ दिवस ६.२५%
१३ महिने. ८%

आमचे यश

32425
खातेदार
1866
महिला सबलीकरण
4003
कर्जदार
28422
ठेवीदार